MRMV Indian

संपर्क : 9420479210
राष्ट्रीय शिक्षण संस्था, मनमाड संचालित

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय, मनमाड

Recognised as per Edn.Inspector,Nashik No.E/7 (N) Dt.20/02/1962 School Index No. 13.09.028, Junior College - J13.09.004, School Code : 451-002

d s sapre
कै.रावसाहेब डी.एस. सप्रे
“आम्ही विद्यार्थ्यांचे भविष्य घडवित नाही तर विद्यार्थ्यांना सक्षम भविष्यासाठी घडवितो”.

प्राचार्यांचे मनोगत

सौ.क्रांती प्रमोद कुंझरकर

एकीकडे देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शतक महोत्सव सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षात संपन्न झाला याचा आम्हास विशेष आनंद वाटतो. ब्रिटिश राजवटीत मनमाड सारख्या ठिकाणी समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळावे म्हणून भारतीयांनी चालू केलेले राष्ट्रीय शिक्षण संस्था,मनमाड संचलित इंडियन हायस्कूल म्हणजेच आमचे मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय. कोणत्याही यशस्वी व्यक्तीच्या जीवन प्रवासात जसे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यावर मात करून अथक परिश्रम करून मोठे यश लाभते.अगदी तसेच विद्यालयाच्या बाबतीत म्हणता येईल. शतकपूर्ती होईपर्यंत काळाच्या ओघात काही समस्या आल्या.समस्यांवर मात करून विद्यालयाचा शतक महोत्सव संपन्न झाला असून दुसर्‍या शतकाला सुरूवात झाली आहे.दुसर्‍या शतकातही विद्यालय नव्या चैतन्याची स्वप्ने मोठ्या धैर्याने पहात आहे. लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी,स्वराज्य, परकीय मालावर बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीतील राष्ट्रीय शिक्षणाची अनुभूती या विद्यालयात मिळू लागली.

अनेक विचारवंत,अनेक कलावंत, अनेक देशभक्त, अनेक क्रीडापटू, विं.दा. करंदीकरांसारखे साहित्यिक, अशोक नायगावकरांसारखे हास्यकवी, अनेक डॉक्टर्स, अनेक इंजिनिअर्स,अनेक क्षेत्रातील अनेक नामवंत म्हणजेच विद्यालयाची शान आणि मान आहेत. राष्ट्रीय शिक्षण अभ्यासक्रमात नेमून दिलेली दहा मूल्ये सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती,राष्ट्रीय एकात्मता,संवेदनशीलता,वक्तशीरपणा,नीटनेटकेपणा,वैज्ञानिक दृष्टिकोन, सौजन्यशीलता,श्रमपरिहार,स्त्री-पुरूष समानता यांचे संस्करण विद्यालयात अनेक उपक्रमाद्वारे केले जाते.

शतकानुगामी गुणवत्ता विकास अभियान सन 2022-2023 पर्यंत राबवले गेले आणि त्याचा सांगता समारंभ नव्या शतकाच्या क्षितिजावरील आव्हाने स्वीकारत झाला.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ विकास व व्यक्तीमत्व विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातात. अनेक उद्बोधन व प्रबोधन वर्ग चालवले जातात. विद्यार्थ्यांना यशस्वी जीवन जगण्यासाठीची जीवनमूल्ये ठसवण्याचा प्रयत्न केला जातो.चांगला माणूस,देशाचा उत्तम नागरिक घडवण्याचे प्रयत्न केले जातात.

विज्ञान प्रदर्शनात राष्ट्रीय पातळीवर झेप, शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत अनेक विद्यार्थी देशात तसेच देशाबाहेर मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. क्रीडा क्षेत्रातही राज्यस्तरीय,राष्ट्रीय स्तर विद्यार्थ्यांनी गाठला आहे.हर्षाली मिस्कर या विद्यार्थिनीने ग्रेपलिंग खेळात राष्ट्रीय स्तर गाठला तर दादासाहेब आचपळे या विद्यार्थ्याने कुस्तीत राज्य स्तर गाठला. आमचे विद्यार्थी आमचा श्वास म्हणूनच करतो त्यांच्यासाठी प्रयत्न खास. खेळातून शारीरिक विकास, कलेतून सृजनशीलतेचा विकास, अध्ययन-अध्यापनातून गुणवत्ता विकास, सहशालेय उपक्रमातून व्यक्तीमत्व विकास, निकोप सामाजिक संबंध ठेवण्यास अथक प्रयत्न हेच आमचे विशेष!

शाळा
उच्च माध्यमिक (विज्ञान विभाग)
शताब्दी मोहोत्सव
सांस्कृतिक उपक्रम
Scroll to Top